Wakad : नागरिकाला स्क्रू ड्रायव्हरने मारहाण

एमपीसी न्यूज : नागरिकाला कोणतेही कारण नसताना स्क्रू ड्रायव्हर व लाकडी पट्टीने मारहाण करत जखमी केले आहे हा प्रकार वाकड (Wakad) येथील भुमकर चौकातील पंडित पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी दि 6 घडला.

Wakad : दुचाकीवरून मोबाईल चोरणाऱ्या चोरांना अटक

याप्रकरणी योगेंद्र दुर्योधन तिवारी ( वय 40 रा. खडकी) यांनी वाकड (Wakad) पोलिस ठाण्यात बुधवारी(दि.7) फिर्याद दिली असून पोलिसांनी मोहम्मद नौशाद (वय.25 रा.वाकड)याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे  त्यांच्या ओळखीच्या इसमाशी बोलत उभे असताना आरोपी तेथे आला व त्याने तयार खोलीच्या स्क्रूने व लाकडी पट्टीने फिर्यादिला मारहाण करत जखमी केले. तसेच फिर्यादीच्या खिशातील 2 हजार 100 रू जबरदस्ती काढून घेतले. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.