Chakan News : चाकणमध्ये कपड्याचे दुकान फोडले, तीन लाखांची कपडे पळवली 

एमपीसी न्यूज – चाकण येथील म्हाळुंगे गावाच्या हद्दीत एक कपड्याचे दुकान फोडले आहे. चोरटयांनी दुकानातील तब्बल तीन लाख किमतीची विविध प्रकारची कपडे चोरून नेली आहेत.  शुक्रवारी (दि. 20) पहाटे अडीचच्या सुमारास हि घटना घडली. 

याप्रकरणी कापड दुकानाचे मालक संतोष दत्तात्रय कुंभार (वय 41, रा. देशमुख कॉलनी, हवेली, पुणे) यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष यांचे म्हाळुंगे गावात ‘डी एस कलेक्शन’ कपड्याचे दुकान आहे. शुक्रवारी (दि. 20) दुकान बंद असताना पहाटे अडीचच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी दुकानाचे शटर उचकटून तब्बल तीन लाख किमतीची विविध प्रकारची कपडे चोरून नेली आहेत. सकाळी प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालकांनी पोलिसात धाव घेतली व तक्रार दाखल केली. याप्रकरणी  पोलीस अधिक तपस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.