सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Mumbai-Pune : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर नागनाथजवळ दरड कोसळली

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) लोहमार्गावर खोपोली हद्दीतील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

Krushna Case : बेपत्ता पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला छिन्नविछिन्न अस्वस्थेत; संपूर्ण परिसरात कसून तपास

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, (Mumbai-Pune) लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवत दरड बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. पुणे ते मुंबई मार्गावर हा घटना घडली आहे.

spot_img
Latest news
Related news