Pune crime news: लोहगावात सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराचे सपासप वार करून खून

A criminal was stabbed to death with sharp knife in Lohegaon.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आजपासून सायंकाळी सहानंतर संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची लगबग सुरू असतानाच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खूनाचा प्रकार उघडकीस आला. एका सराईत गुन्हेगाराचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

सुमित जगताप (वय 33) असे खून झालेल्याचे नाव आहे. मयत सुमित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाण आणि दहशत निर्माण  केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शनिवारी रात्रीच्या सुमारास सुमित जगताप हा लोहगाव परिसरात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. आरोपींनी चेहऱ्यावर वार केल्याने सुमित याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी चारचाकी वाहनातून पसार झाले. या घटनेने लोहगाव परिसरात मात्र एकच दहशत माजली आहे.

खूनाचे नेमके कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.