Hinjawadi : ऑर्डरला उशीर झाल्याने विचारणा करणाऱ्या ग्राहकास हॉटेलच्या व्यवस्थापकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – वेटरने मसाला पापड आणि पाणी उशिरा आणले. याबाबत ग्राहकाने वेटरकडे विचारणा केली. यावरून हॉटेलमधील व्यवस्थापक आणि त्याच्या तीन साथीदारांनी ग्राहकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 29) हॉटेल एरिया 51 हिंजवडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

चंद्रकांत रामदास लामखडे (वय 30, रा. मातेरेवाडी घोटावडे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हॉटेलमधील व्यवस्थापक व  त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथे हॉटेल एरिया 51 हे हॉटेल आहे. फिर्यादी चंद्रकांत गुरुवारी रात्री त्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. त्यांनी वेटरला मसाला पापड आणि पाणी आणण्यासाठी सांगितले. वेटरने ही ऑर्डर उशिरा आणली. त्याबाबत चंद्रकांत यांनी त्या वेटरकडे विचारणा केली. यावरून वेटरने हॉटेलच्या व्यवस्थापकाला सांगून तसेच त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून चंद्रकांत यांना बेल्ट, लाकडी काठी व पाईपने मारहाण केली. यामध्ये चंद्रकांत जखमी झाले. तसेच आरोपींनी चंद्रकांत यांच्या मोटारसायकलची ही तोडफोड केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.