Vadgaon Maval News : अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली खासदार शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज – ग्रामविकासात महत्वाची भूमिका बजावणा-या सरपंचांना त्यांचे हक्क व बहुमान मिळावा यासाठी पंचायतराज विकास मंच संचालित (Vadgaon Maval News) अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन खासदार शरद पवार यांना दिले. शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तात्काळ चर्चा करून सरपंच परिषदेच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

राज्यभरात ग्रामीण भागात सरपंच म्हणून ग्रामीण विकासात योगदान देणाऱ्या सरपंचांना त्यांचे हक्क व बहुमान मिळावा यासंदर्भात पंचायतराज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने खासदार शरद पवार यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या. दरम्यान संबंधित मागण्यांबाबत पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडल्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे (Vadgaon Maval News) यांनी सांगितले.

सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह विधिज्ञ ॲड श्रीराम पिंगळे, पीआरविम संस्थेचे उपाध्यक्ष सुहास चव्हाण,एबीएसपीचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे,राज्य संपर्क प्रमुख सचिन जगताप, मुंबई विभाग प्रमुख अनिल ढवळे, रायगड जिल्हा प्रमुख नंदू भोपी, ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिल भोईर, पुणे जिल्हा महिला आघाडी उज्वला गोकुळे,रायगड जिल्हा अलिबाग विभाग सोमनाथ ओझर्डे,खेड तालुका अध्यक्ष विद्या मोहिते, मावळ तालुका अध्यक्ष सुनील भोंगाडे,सरपंच सतीश भाडळे,सरपंच विलास शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सयाजीराजे मोहिते यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली.

ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून व करांची वसुली करण्यासाठी मदत करून ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम कराव्यात. सरपंचपदासाठी सहा विभागात सहा राखीव आमदार मतदारसंघ निर्माण करावेत; तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदार निवडणुकीत पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांना मतदानाचा हक्क मिळावा.

सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात भरीव वाढ व्हावी आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मिटिंग उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी. मुंबईमध्ये निवास व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लायब्ररी असे सुसज्ज सरपंच भवन उभारावे, सरपंच निवड सदस्यातून करण्याऐवजी पूर्वीप्रमाणे जनतेतून (Vadgaon Maval News) व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या.

दरम्यान पवार यांनी लगेचच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना फोनद्वारे चर्चेत सहभागी करून घेत खेड्यांचा विकास साधायचा असल्यास सरपंच व सहकारी यांना बळ दिले पाहिजे असे सूचित केले. तसेच ग्रामपंचायतशी निगडित सर्व खात्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे सुचविले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.