Pune : प्रॉपर्टीकार्डवर थेट नाव लागणार

एमपीसी न्यूज – दस्त नोंदणीची आय-सरिता प्रणाली व महापालिकेची संगणकीय कर प्रणाली यांच्या जोडणीमुळे प्रॉपर्टीकार्डवर थेट नाव लागणार आहे. त्यासंदर्भातील विषयाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या जोडणीमुळे दस्त नोंदणीचे वेळी मालमत्ता हस्तांतरण करणाऱ्याचे नाव प्रॉपर्टीकार्डच्या अभिलेखाखाली ताळमेळ घेतला जातो. मालमत्ता हस्तांतरण करणाऱ्यांची आद्यगी प्रलंबित आहे का? याची खातरजमाही केली जाते. महापालिकेच्या स्तरावर या डाटाची पडताळणी करून प्रॉपर्टीकार्ड अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे प्रॉपर्टी कार्डवरील नावात बदल करण्यासाठी नागरिकांना आता यापुढे महापालिकेकडे स्वतंत्र अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.