Dehugaon News : देहूगावातील शेतक-याने केली अफूची लागवड 

एमपीसी न्यूज – देहूगावातील एका शेतक-याने त्याच्या शेतामध्ये चक्क अफूची लागवड केली. ही बाब निदर्शनास येताच पोलिसांनी त्या शेतक-याला बेड्या ठोकल्या आहेत.
_MPC_DIR_MPU_II
जालिंदर विनायक काळोखे (वय 60, रा. काळोखे मळा, विठ्ठलनगर, देहूगाव) असे अटक केलेल्या शेतक-याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जालिंदर हा शेतकरी आहे. त्याने आपल्या शेतात अफू या अंमली पदार्थांच्या झाडाची लागवड केली. याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी बुधवारी (दि. 24) रात्री त्याच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यावेळी अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी जालिंदर याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.