Pune News : एसटीतील सहकारी प्रवासी महिलेने पेढा खायला देऊन अडीच लाखाचे दागिने लुबाडले

एमपीसी न्यूज : एसटीने प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या प्रवासी महिलेने पेढा खाण्यास दिल्याने महिलेला गुंगी आली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने तिच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असे अडीच लाख रुपये किंमतीची बॅग चोरून नेली. बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सुरेखा सुग्रीव जाधव (वय 50) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला दादर ते पुणे असा एसटीने प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका महिलेने फिर्यादी यांना पेढा खायला दिला. हा पेढा खाल्ल्यानंतर फिर्यादी यांना गुंगी आली. तसेच त्यांची जीभ देखील जड होत होती.

पुणे बस स्थानकावर खाली उतरल्यानंतर आरोपी महिला फिर्यादी यांना ससून हॉस्पिटल येथे घेऊन गेली. तसेच तुमचा एक्स-रे काढायचा आहे असे सांगून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून फिर्यादीच्या बॅगमध्ये ठेवले. फिर्यादीने ही बॅग विश्वासाने आरोपी महिलेजवळ दिली असता ही महिला बॅग घेऊन निघून गेली.

बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.