_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : मास्कची विचारणा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत नोकरी घालवण्याची धमकी

तरुणीसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज : नाका-बंदी दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांना मास्क का घातला नाही अशी विचारणा करणाऱ्या महिला पोलिस शिपायाला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकात बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एका तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

अँथोनी सेबस्टिसन डिलीमा (वय 69, रा. सोपानबाग, घोरपडी) आणि अलिशा अँथोनी डिलीमा (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विद्या लक्ष्मण पोखरकर (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खडकी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्या बोपोडी येथील आंबेडकर चौकात नाका बंदी वर कर्तव्यावर असताना वरील दोन्ही आरोपी दुचाकीवरून जात होते. यावेळी दुचाकीचा पाठी मागे बसलेल्या अलीशा हिने मास्क घातला नव्हता. त्यामुळे विद्या पोखरकर यांनी त्यांना दुचाकी थांबवण्याचा इशारा केला असता दुचाकी त्यांच्या अंगावर घातली. फिर्यादी यावेळी बाजूला झाल्या असता गाडीचे चाक फिर्यादीच्या पायाजवळ आणून त्यांना धडक दिली.

दरम्यान यावेळी विद्या पोखरकर यांनी अलिषा हिला मास्कबाबत विचारणा केली असता ‘तू कोण मास्क विचारणारी, तुझी नोकरीच घालवते’ असे बोलून इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.  पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.  खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.