Thergaon News : मास्कविना फिरणा-यांकडून केला पाच लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रभाग क्रमांक 24 गणेशनगर प्रभागात कोरोना महामारी काळात लॉकडाऊन पासून ते आजपर्यंत मास्कविना फिरणा-यांवर धडक कारवाई केली आहे. मास्कविना फिरणा-या एक हजार जणांकडून पाच लाखाचा दंड वसूल केला आहे.

कोरोनापासून काळजी घेण्यासाठी सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक केले असताना अनेकजण मास्कविना फिरत होते.  प्रभाग क्रमांक 24 गणेशनगर या भागात कोरोना महामारी काळात लॉकडाऊन पासून ते आजपर्यंत तब्बल मास्कविना फिरणा-या एक हजार  नागरिकांना प्रत्येकी 500 रुपये दंड रक्कम आकारण्यात आली असून एकून पाच लाखाचा दंड वसूल केला आगे. नागरिकांना वेळोवेळी मास्क लावण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.

सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजू बेद  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचे आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, कर्मचारी प्रशांत पवार ,राजू जगताप, अभय दारोळे, अरुण राऊत, अनिल डोंगरे, सूर्यकांत चाबुकस्वार यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.