Chinchwad : कर्जाची माहिती न देता खोली विकून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज – खोलीवर घेतलेल्या कर्जाची माहिती न देता त्या खोलीची विक्री करून एकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 सप्टेंबर 2019 ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

विश्वास दत्तात्रय गायकवाड (रा. माहिती नाही. पूर्वीचा पत्ता – ओम साई कॉलनी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नाथु मारुती माने (वय 47, रा. तळेगाव दाभाडे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची तळेगाव दाभाडे मधील शनिवार पेठेत भेगडे तालमीच्या मागे एक खोली होती. त्या खोलीवर त्याने कॉर्पोरेशन बँक, तळेगाव दाभाडे या बँकेकडून नऊ लाख रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज असताना विश्वास याने ही खोली फिर्यादी माने यांना नऊ लाख रुपयांना विकली. माने यांच्याकडून नऊ लाख रुपये घेऊन त्यांना खोलीवरील कर्जाबाबत काहीही माहिती दिली नाही. तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते देखील भरले नाहीत. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.