Pune Crime News : वापरण्यासाठी घेतलेली मित्राची मर्सिडीज परस्पर विकली, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : वापरण्यासाठी घेतलेली मित्राची मर्सिडीज कार परस्पर विकल्या चा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मर्सिडीज कार आपण विकत घेणार असून त्याआधी वापरण्यासाठी म्हणून आरोपीने ही कार घेतली होती. त्यानंतर परस्पर त्याने ती विकून टाकली. 

याप्रकरणी इम्रान अमर शेख व प्रशांत ज्ञानोबा गायकवाड या दोघांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अमिरुल्ला हाबिबुल्लाह चौधरी (वय 43) त्यांनी याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांच्याकडे असलेली मर्सिडीज बेंज कार त्यांनी विकण्याचे ठरवले होते. त्यांचा मित्र असलेला आरोपी इम्रान शेख यांनी मी ही गाडी विकत घेणार असल्याचे सांगितले. परंतु त्याआधी वापरून पाहतो आणि चांगली वाटते तर विकत घेतो असे सांगितले होते. त्यानंतर फिर्यादीने विश्वासाने गाडी त्याच्याजवळ दिली होती. त्यानंतर आरोपीने परस्पर गाडी खरेदीची नोटरी करून स्वतःचे फायद्यासाठी तिची परस्पर विक्री केली. वारजे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.