_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

गावठी पिस्तुलासह घातक शस्त्र जप्त

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चणीन कॅनॉलजवळ पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीच्या ताब्यातून घातक शस्त्रास्त्र आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले.  लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

गणेश राजेंद्र शिवडकर, सुनील प्रकाश गायकवाड, तिलकसिंग गब्बरसिंग टाक, निशांत उर्फ ब्लॅक अनिल ननावरे, किशोर प्रकाश गायकवाड आणि आकाश गणपत माने या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांना पोलिसांनी अटकही केली आहे. पोलीस हवालदार उदय काळभोर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

प्रकरणी अधिक माहिती अशी की, वरील सर्व आरोपी सोलापूर महामार्गावरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एका चार चाकी गाडी सह एका ठिकाणी दबा धरून बसलेल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी या सर्व आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, कटावणी, कटर, चाकू, कात्री, मिरचीपूड असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.