BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : घराकडे तोंड करून लघुशंका करण्यास मनाई करणार्‍या चालकाला टोळक्याची जबर मारहाण

एमपीसी न्यूज – घराकडे तोंड करून लघुशंका करणार्‍या दोघांना लघुशंका करण्यास मनाई केल्यामुळे चालकाला सहा जणांच्या टोळक्याने बांबूने मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे गुरूवारी रात्री हा वाजता घडली.

सुर्यकांत विश्वनाथ जाधव (वय-42, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय चिमाजी ढवळे (वय-21), अनिकेत नृसिंह कांबळे (वय-22), राकेश बसवराज कांबळे (वय-22), सुरज नागनाथ कांबळे (वय-21), आशिष विजय गोयर (वय-21), शिवम अरूण फडतरे (वय-21, सर्व रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांच्या घराकडे तोंड करून आरोपी अक्षय, अनिकेत लघुशंका करत होते. येथे लघुशंका करू नका, असे जाधव यांनी आरोपींना सांगितले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने दगड व बांबूने जाधव यांना जबर मारहाण केली. तसेच कोयता उगारून मुडदाच पाडतो, अशी धमकी देत फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला. सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like