Bhor news: राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत अवैध मटका चालवणारी टोळी एक वर्षासाठी तडीपार

एमपीसी न्यूज : पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणाऱ्या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

राजेंद्र कोंडे, वय 50 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, राजेश नायर, वय 32 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, दिलीप शिंदे, वय 47 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, पापाभाई शेख, वय 59 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, संदीप शिंदे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, विशाल कदम, रा. शिवाजीनगर, ता. हवेली, जिल्हा पुणे, पंकज कोंडे, वय 32 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, खंडू खांबे, वय 26 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे यांच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात अवैधरित्या मुंबई व कल्याण नावाचा मटका अड्डा चालविणे अशा प्रकारचे एकूण 7 गुन्हे दाखल होते.

माणसा माणसामध्ये असणारी विषमतेची घाण गाडगे बाबांनी साफ केली : वि. दा. पिंगळे

या टोळीतील प्रमुख राजेंद्र कोंडे यांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिक, कामगार वर्ग, तसेच स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये टोळीची दहशत निर्माण केली होती. त्यांच्याबरोबर वेळी कोणी दाखल करूनही त्यांच्या गुन्हेगारी कृत्यात कोणताही फरक पडला नाही. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तयार करून धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सादर केला होता. या प्रस्तावाची धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग सासवड यांनी सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी या टोळीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना 25 नोव्हेंबर 2022 असून पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधी करिता तडीपार करण्यात येत असल्याबाबतचे आदेश पारित केलेले आहेत. हा देश पारित झाल्यापासून एकूण आठ इस्मान पैक्की पैकी सहा इसमांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हे इसम हद्दपार करण्यात आलेल्या परिसरामध्ये दिसून आल्यास राजगड पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गणेश शाखा पुणे ग्रामीण यांना संपर्क करण्याबाबत आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.