Pune News : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला पुण्यातून अटक

एमपीसी न्युज : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ५ कोटी रुपये किमंतीचे जवळजवळ ५ किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आली आहे.

अक्षय ठाणगे, विजय ठाणगे, अजीम काजी, नवाज कुडपकर, राकेश कोरडे अशी आरोपींची नावे आहेत.

Pune News: इंग्रजी विषय तज्ञ बाळासाहेब आल्हाट यांना राज्यस्तरीय महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

पुण्यात ही टोळी एका व्यक्तीला हा पदार्थ देण्यासाठी आले होते.

डेक्कन पोलिसांना गोपिनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या ४ जणांना अटक केली आहे.

आरोपी हे मूळचे दापोलीचे राहणारे असून पुण्यात हे ते विकण्यासाठी आले होते.

नेमका याचा वापर हे पुढे कशासाठी करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.