Pimpri : गॅस कटरने चिखलीतील एटीएम फोडणारे तिघे गजाआड

एमपीसी न्यूज – एटीएम फोडून साडेअकरा लाख रुपये लुटणाऱ्या तिघांना पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) अटक केली आहे. 10 नोव्हेंबर 2019 रोजी चिखली येथील एटीएम फोडले होते.

याप्रकरणी वकील ऊर्फ शकील मोहम्मद हारून, जाकर ऊर्फ जाकीर इद्रीस खान (वय 36), इनाम नसरू खान (वय 33, सर्व रा. हरियाणा), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिखली येथील गुन्ह्यातील तपासात आरोपी वकील याच्याशी साम्य असल्याचे दिसून आले. त्याला दिल्ली पोलिसांकडून चिखलीतील गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने 10 नोव्हेंबर 2019 रोजी आपल्या साथीदारांच्या मदतीने चिखली येथील ऍक्‍सीस बॅंकेचे एटीएम गॅस कटरने कापून नेल्याची कबुली दिली.

त्यानुसार त्याचे साथीदार इनाम खान आणि जाकीर खान या दोघांना हरियाणातून अटक केली. वकील याला 13 जानेवारीपर्यंत तर त्याचे दोन साथीदार इनाम खान व जाकीर खान यांना 17 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.