Bhosari : पीएमपी बस प्रवासादरम्यान 75 हजारांची सोन्याची बांगडी पळवली

A gold bangle worth Rs. 75000 snatched the PMP bus journey in Bhosari area.

एमपीसी न्यूज – पीएमपी बस प्रवासा दरम्यान वृद्ध महिलेची 75 हजारांची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना निगडी ते दापोडी बस प्रवासादरम्यान सोमवारी (दि. 2) दुपारी घडली.

नागिनी लक्ष्मण रंगसुभे (वय 57, रा. दादर मुंबई) यांनी याबाबत सोमवारी (दि. 2) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंगसुभे या सोमवारी दुपारी पावणेबारा ते साडेबारा या कालावधीत निगडी ते दापोडी या मार्गावर पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या हातातील 75 हजार रुपये किमतीची 25 ग्राम वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.