Tata Motors : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टाटा मोटर्समध्ये ‘कमवा आणि शिका’ची सुवर्णसंधी

एमपीसी न्यूज – कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काम करून शिकण्याची सुवर्णसंधी टाटा मोटर्सने (Tata Motors) उपलब्ध करून दिली आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत मुलांना शिक्षण घेत काम करण्याचीही संधी मिळणार आहे.

टाटा मोटर्स पुणे (Tata Motors) येथे एनटीटीएफच्या माध्यमातून कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींसाठी ‘कमवा व शिका’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत Diploma In Manufacturing Technology हा अभ्यासक्रम मुलांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन पूर्ण करता येणार आहे.

Pune News : पुण्याच्या सहकारनगरमध्ये भरधाव टेम्पोचा थरार; अनेक वाहनांना उडविले, एकाचा मृत्यू

यासाठी विद्यार्थ्यांना 12 हजार 850 रुपये विद्यावेतन दिले जाईल. त्याबरोबर कँटीन (1 वेळचे जेवण, 2 वेळचा चहा, नाश्ता महिना 15 रुपये फक्त), मोफत बस सुविधा, गणवेश, सेफ्टी शूज, आरोग्य विमा आदी सुविधा मिळणार आहेत. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्ष आहे.

अधिक माहितीसाठी 9325320327, 8793508280, 7397802522, 9834920764, 9021719017, 7758928182, 9890247566 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.