Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांना बारकाईने समजावा यासाठी पेंटिंगचे भव्य प्रदर्शन 

    माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक चे आयोजन 

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवर कधीही न पाहिलेल्या राजमुद्रावर आधारित पेंटिंग्जच्या भव्य प्रदर्शनाचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते यांच्या गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. सनी निम्हण यांनी नागरीकांना, युवकांना महराजांचा बारकाईने इतिहास समजावा म्हणून प्रदर्शन भरवले आहे. महाराजांच्या मुद्रा कशा असतील याचे सुंदर पेंटिंग रेखाटले गेले आहे. या प्रदर्शनाने तरुणांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार आहे.

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम पुणे विभागामध्ये ( PABBS west festival) पाषाण, औंध, बाणेर, बोपोडी, सोमेश्वरवाडी या भागातील नागरिकांसाठी, सुपर सनी विक – आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   या उपक्रमाअंतर्गत राजमुद्रा प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पोपटराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सनी निम्हण, भारत जोरे, धनंजय बामगुडे, बाळासाहेब बामगुडे, संतोष सपकाळ, संजय माझीरे, ज्ञानेंद्र हुरसुले (राणे क्लासिक) , विजयन मेनन (शिवरंजन टॉवर) पूर्वंत काका(सोमेश्वर पार्क), विजय भोसले(सोमेश्वर पार्क), विवेक जगताप (बेलस्कॉट सोसायटी) यांच्या उपस्थिती मधे झाले.

 सदर प्रदर्शनाचे आयोजन अजय काकडे, शिवम दळवी, विनय निम्हण, ऋषी निम्हण, अतुल काकडे, गोकुळ जाधव, विष्णू काकडे, अविनाश गायकवाड, अमोल जोरे, रोहित किरदत्त, अनिमेश दातार, निखिल आरगडे व चित्रकार नितीन अडके आदीमान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. व  सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे परिसरात पाषाण, औंध, बाणेर, बोपोडी, सोमेश्वरवाडी, व ईतर भागातील नागरिकांसाठी, सुपर सनी विक आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 या मध्ये १९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२१  दरम्यान  विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग घेण्याची संधी सनी विनायक निम्हण यांनी उपलब्ध करून दिली आहे.

घेण्यात येणारे उपक्रम

१) राजमुद्रावर आधारित पेंटिंग्जच्या भव्य प्रदर्शन

२) ड्रॉइंग डिलाइटस : दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय गटासाठी भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन
३) मॉम्स मॅजिक : दि.२३ ते २८ फेब्रुवारी गृहिणी साठी खास पाककृती स्पर्धा.
४) सायन्स सर्कस : दि. २७ ते २८ फेब्रुवारी : शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या मॉडेल वर आधारित आधारित प्रदर्शन.
५) जूनियर सायकलोथाॅन : दि. २८ फेब्रुवारी १२ ते १८ वर्ष मुलांची सायकल स्पर्धा.
६) सनीज् आरोग्य अभियान : मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत रक्त लघवी तपासणी. या विविध उपक्रमांनी सनीज् वीक साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मुलांनी सहभाग घ्यावा असे आव्हानही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

   स्थळ:- संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान, सोमेश्वरवाडी, (पेठ जिजापुर), पाषाण.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.