Pimpri : शहरातून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातूनच नव्हे तर बाकी शहरातूनही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे येत आहे. पिंपरीगाव व परिसराकडून सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. एक हात मदतीचा या आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमांतर्गत स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी कपडे खाद्यपदार्थ आदी मदत आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयात जमा केली.

यावेळी कामगार नेते सचिन लांडगे उपस्थित होते.

आज कोल्हापूर, सांगली आणि कऱ्हाड व इतर भागामध्ये जी अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या भागातील संपूर्ण मानवी जीवनच उध्वस्त झाले आहे. पाळीव जनावरे तसेच शेतीही पूर्ण बुडाली आहे. महाराष्ट्रातील संवेदनाक्षम तरुण सर्व माध्यमातून मदत उभी करत आहेत. तळमळीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

उन्नती सोशल फाऊंडेशन आणि आनंद हास्य योग क्लब यांचा मोठा सहभाग घेतला. तसेच काही विशेष सहकारी गुरुमाऊली भजनी मंडळ, ब्रम्हचैतन्य आयुर्वेद, सुभाष नारायण काटे, जगदीश माळी, एन एस दीक्षित, राम बंडगर, प्रकाश माशालकर, केशव मुजुमदार व समस्त पिंपळे सौदागर ग्रामस्थ आदींनी सहभाग घेतला.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे  व अण्णा शेलार यांच्या हस्ते  “आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची” ग्रुपला ब्लॅंकेट, पाण्याचे बॉक्स, खाद्यतेल, धान्य, इत्यादी वस्तू देण्यात आले. यावेळी ग्रुपचे संचालक  प्रशांत लवटे, अभिषेक कुंभार ह्यांच्याकडे सुपूर्त केले. या वेळी कुंदा भिसे म्हणाल्या, आपण समाजाचे काही देणे लागतो त्यामुळे ज्यांना मदत करायची असेल त्यांनी उन्नती सोशल फाऊंडेशनशी संपर्क साधावा. पत्ता : उन्नती सोशल फाऊंडेशन, जर्वरी सोसायटी, कोटक बँके शेजारी,  पिंपळे सौदागर. संपर्क :9146087777.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.