_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune: Covid-19  पोलीस योध्दांकरीता मदतीचा हात – 3000 PPE किट

A helping hand of 3000 PPE kits to Corona Police warriors by Vaishnavi Mahila Unnati Sanstha, Pune.

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. अशा कठिण काळातही स्वत:चे वयाची, प्रकृतीची पर्वा न करता निर्भय, खंबीर योध्दाप्रमाणे पुणे शहर पोलीस दल आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहे.

पोलीसांचा दैनंदिन स्तरावर अनेक नागरिकांशी थेट संपर्क येत असतो. या संपर्कातून पोलीसांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.

दैनंदिन कर्तव्य बजावताना अनेक पोलीस देखील बाधित होत आहेत. दिवसेंदिवस बाधित होणा-या पोलीसांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

अशा परिस्थितीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीसांना अधिकाधिक प्रतिबंधात्मक साहित्यांचा पुरवठा करणे आवश्यक आहे.

या पाश्र्वभूमीवर वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या वतीने पुणे शहर पोलीसांना  Covid 19 पासून संसर्ग होऊ नये याकरीता 3000 PPE किट आज दि.22/07/2020 रोजी सायं.04.00 वा. वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे च्या अध्यक्षा सौ. राजश्री नागणे पाटील यांनी मा.पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम् यांचेकडे सुपूर्द केले.

वैष्णवी महिला उन्नती संस्था, पुणे यांनी ज्या वैचारिक व भावनिक दृष्टिने पुणे शहर पोलीसांना मदत केली आहे ती कौतुकास्पद असून आजची गंभीर परिस्थिती पाहता इतर संस्थांनी देखील सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे मत डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केले.

पोलीस दलाबरोबरचं Covid  19 मध्ये कार्य करणा-या इतरही शासकीय यंत्रणांना अशा प्रकरे मदत मिळणे आवश्यक असून वैष्णवी महिला उन्नती संस्थेप्रमाणे इतरही सामाजिक संस्था मदतीकरीता पुढे येतील अशी अपेक्षा डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.