Pune News : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज – पुणे ः अतिवृष्टीमुळे महाडमध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. तेथील अनेकांसमोर जेवण, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

आवश्यक सामान घेऊन दि.29, जुलै रोजी ट्रक महाड येथे पोहचला असून, गरजू कुटुंबाना मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने दोन दिवसांत 700 ते 800 किलो धान्य, औषधे, गरजेच्या वस्तू, खाण्याचे जिन्नस जमा करण्यात आले.

साहित्याचे पॅकिंग करण्यासाठी लक्ष्मीकांत धडफळे, केतकी कुलकर्णी, राहुल जोशी, कमलेश जोशी, राहुल करमरकर, विकास अभ्यंकर, शंतनू खिस्ते, धनश्री धडफळे, सरस्वती जोशी, मंदार रेडे यांनी नियोजन केले.

महासंघाच्या पदाधिकारी सानिका खरे, अनघा पराई, शिल्पा महाजनी, शिवानी अभ्यंकर यांनीही यासाठी योगदान दिले. औंध येथील वुमन आंत्रुप्रिनर ॲन्ड व्हॅल्यू एन्हान्सिंग या संस्थेने ट्रकचे भाडे व डिझेल स्पॉन्सर केले.

महासंघाने याबाबत हर्षाली मुरुडकर यांचे आभार मानले. या उपक्रमासाठी ऑस्ट्रेलियाहून रेखा ओक यांनी मोठी आर्थिक मदत पाठवली असल्याचे महासंघाने म्हटले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.