Kasarsai : कासारसाई येथे घरफोडीत करून एक लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून (Kasarsai) अज्ञातांनी घरातून 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत कासारसाई येथे घडली.

राजीव गंगाधर नामपेल्लेलू (वय 47, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dapodi Crime News : भाजी विक्रेत्या महिलेचा विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून 4.8 तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास (Kasarsai) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.