Pune News : कात्रज परिसरात भीषण आग, दोन किलोमीटरवर वणवा पेटला

एमपीसी न्यूज : शहरातील कात्रज बोगद्यानजीक असलेल्या मालकी क्षेत्रात आज संध्याकाळी साडेआठच्या सुमारास अचानक आग लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट पसरल्याचे  दिसून आले आहे. हद्दीच्या वादामुळे आग नेमकी कोणी विझवायची यासंदर्भात प्रशासनाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आगीचा वनवा धुसमुसत होता.

खासगी जागेतील झाडांना आग लागल्याने सुमारे दोन किलोमीटरवर आगीचे लोट दिसून आले. बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कात्रजमधील लागलेल्या आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशमक दलाला दिली होती. त्यानुसार अग्निशमक दलाने वनविभागाला आगीची माहिती दिली.

मात्र खाजगी जागेत आग लागल्याचे कारण देत वनविभागाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले नसल्याचा आरोप प्रत्यक्ष दर्शनी केला आहे. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण न मिळाल्याने वनवा भडकल्याचे दिसून आले. यासंदर्भात वनविभागातील अधिकार्‍यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.