Bhosari : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून दोन जणांनी मिळून तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. 14) दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमा गोडाऊन चौक पांजरपोळ येथे घडली.

किशोर रमेश मोहिते (वय 29, रा. गोडाऊन चौक, पांजरपोळ, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनोहर बापू मोहिते, अजय मगन मोहिते (रा. गोडाऊन चौक, पांजरपोळ मागे, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर आणि आरोपी यांच्या लहान मुलांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यावरून आरोपींनी संगनमत करून किशोर यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये किशोर यांच्या बोटाचा परा तुटला. तसेच आरोपींनी किशोर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. किशोर यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करत मारहाण केली. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.