Nigdi : महाविद्यालयातील केबिनमधून लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – यमुनानगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथील एका केबिनमधून 30 हजार 500 रुपयांचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

मोहिनी चेतन कुचेकर (वय 34, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगर येथे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात फिर्यादी मोहिनी नोकरी करतात. गुरुवारी मोहिनी काम करत असलेल्या महाविद्यालयातील केबिनमधून दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने 30 हजार 500 रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.