Pimpri News: समाजातील मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी मानसिक प्रथमोपचार कार्यकर्त्यांची मोठी गरज : डॉ. शुभा थत्ते 

एमपीसी न्यूज – समाजातील मानसिक स्वाथ्य टिकविण्यासाठी मानसिक प्रथमोपचार कार्यकर्त्यांची मोठ्या  प्रमाणात आवश्यकता असल्याचे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभा थत्ते यांनी व्यक्त केले.

व्हीजन  महाराष्ट्र फौंडेशनच्या मानसिक प्रथमोपचार या पुस्तकाच्या ऑनलाईन अनावरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, मानसिक आजाराबद्दल फार गैरसमज पसरलेले दिसतात त्यामुळे अगदी सुरवातीच्या  काळातील मानसिक ताणतणाव हे प्रथमोपचारा अभावी गंभीर मानसिक आजारात रूपांतरित होतात. समाजाचे सर्वांगीण आरोग्य चांगले राहण्यासाठी मानसिक प्रथमोपचार हि संकल्पना रूढ होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मानसिक प्रथमोपचार या पुस्तिकेसाठी एकूण 22 मानसोपचार तज्ज्ञांनी लिखाण केले असून त्यामध्ये व्यसनाधीनता, भयगंड, चिंतारोग, अवास्तव जाणीव, शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेली मानसिक अस्वस्थता  अल्झायमर, स्वमग्नता आदी विविध विषयांवर सर्व सामान्यांना कळेल, अशी माहिती उपलब्ध आहे.

डॉ . शुभा थत्ते यांनी सायकोलॉजी मध्ये Phd केली असून त्या मागील 24 वर्षे  KEM व जी. एस. कॉलेजमध्ये सिनियर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम पाहत आहेत.

तसेच त्या IPH प्रसिद्ध संस्थेच्या संस्थापिका  आहेत. या पुस्तिकेच्या निर्मितीमध्ये डॉ. शुभा थत्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे  पुस्तकाचे संयोजक  डॉ. यश वेलणकर आणि अर्चना मुळे यांनी सांगितले.

वैशाली कार्लेकर या पुस्तिकेच्या संपादक असून नुकतेच म्हणजे  13 एप्रिलला पुस्तिकेची प्रथम आवृत्ती प्रकाशित करण्यात  आली. मानसिक  प्रथमोपचार  या संकल्पनेच्या अधिक माहितीसाठी  [email protected] या ईमेल अड्रेस वर संपर्क करण्याचे आवाहन व्हिजन  महाराष्ट्र फाऊडेशन या संस्थेने केले आहे.  या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मुळे यांनी केले तर आभार डॉ. वैशाली ढोले यांनी आभार मानले.

या प्रकाशन सोहळ्याची लिंक 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.