Alandi : आळंदी कार्तिकी एकादशी निमित्त दर्शन मंडपाबाहेर वारकरी भाविकांची मोठी रांग

एमपीसी न्यूज : रविवार 20 नोव्हेंबर रोजी (Alandi) असणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी भाविक भक्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी दर्शनाकरिता व सोहळ्या करीता आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. दि.19 रोजी नदीपलीकडील दर्शनबारी मंडप पूर्णपणे भरून दर्शन मंडप ते (नदीपलीकडील) बस स्थानक समोरील पोलीस मदत केंद्र, पोलीस मदत केंद्र ते (जुन्या पुलाजवळील) भागेश्वर धर्मशाळेसमोरील रस्त्यावर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी संध्याकाळी 7 च्या सुमारास मोठी रांग लागली होती.

Thergaon : आता लोकशाही वाचवण्याची जबाबदारी पत्रकारितेवर आहे – कुमार केतकर

रात्री उशिरापर्यंत दिंड्यांचे शहरात आगमन होणार आहे. माऊली (Alandi) मंदिरामध्ये रात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत पवमान अभिषेक व दुधारती 11 ब्रम्हवृंदाच्या वेदघोषात होणार आहे. दुपारी 12 ते 12:30 महानैवेद्य, दुपारी 1 वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा, रात्री 8:30 वा. धुपारती, रात्री 12 ते पहाटे 2 जागर कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.