Khandala Bus Accident News: खंडाळा घाटातील अंडा पॉईंट जवळ लक्झरी बस उलटली

एमपीसी न्यूज: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील अंडा पाॅईट जवळ आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक लक्झरी बस उलटली आहे. या बस मध्ये 48 विद्यार्थी होते. अपघातामधील जखमींना खोपोली भागातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Chinchwad News: पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सगळ्यांना पटेल अशी भाषा वापरायला हवी होती – विरोधीपक्ष नेते अजित पवार

चेंबूर येथील एका खाजगी क्लासचे विद्यार्थी लक्झरी बस क्र. MH 04 GP 2204 मधून लोणावळ्यातील वेट अँन्ड जाॅय येथे आले होते. परतीच्या प्रवासात असताना खंडाळा घाटातील वळणावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजताच बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून बसमधील जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.