Wakad News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडीओ प्रकाशित करणा-यास अटक

एमपीसी न्यूज – राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्युबवर प्रकाशित केल्याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

युवराज दाखले (रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च रोजी आरोपी युवराज दाखले याने युट्युबवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामी करणारा मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केला. प्रसारित केलेल्या व्हिडिओचा कुठल्याही प्रकारचा पुरावा दाखले याच्याकडे नसताना हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. यामुळे फिर्यादी महिला कार्यकर्त्या आणि पक्षातील इतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असंतोष आणि रोष निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप दाखले याने व्हिडीओच्या माध्यमातून केला होता. या प्रकरणाचे थेट विधानसभेत पडसाद उमटले होते. फडणवीस यांच्यावर झालेल्या या आरोपावरून भाजप अक्रमक झाले. याप्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.