Pune news: सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असल्‍याचे भासवून फिरणाऱ्या तोतयाला पुण्यातून अटक

A man impersonating a lieutenant colonel in the army was arrested from Pune.

एमपीसी न्यूज- भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल असल्याचे भाषण पुण्याच्या किरकटवाडी परिसरात फिरणाऱ्या एका तोतयाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. अंकित कुमार सिंह (वय 23 सध्या राहणार उत्सव सोसायटी किरकट्वाडी मूळ राहणार हसनपूर, आमरोह, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. 

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे, लष्कराचा पोषाख, दहा ओळखपत्रे, दोन मोबाईल, एक टॅब, प्रिंटर, लॅपटॉप, लष्कराची महत्त्वाची ओळख चिन्हे, लष्करी बूट, पट्टा, लष्कराचे चिन्ह असलेली टोपी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक व्यक्ती लष्कराच्या पोशाखात फिरत असून तो लेफ्टनंट कर्नल असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किरकिटवाडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. तो सांगत असलेली पत्नी मीनाक्षी हिला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

हवेली पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.