Sangvi : दारू पिताना झालेल्या भांडणातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

a-man-murdered-in-sangvi-after-an-fight-while-having-liquor

एमपीसी न्यूज – दारू पिताना झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना आज रविवारी (दि. 17) पिंपळे गुरव येथे घडली.

संतोष कुलकर्णी (वय 44, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत संतोष आणि त्याचे मित्र मागील काही दिवसांपासून एकत्र दारू प्यायला एकत्र बसत होते. दरम्यान त्यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडणेही झाली होती. रविवारी दुपारी सर्व मित्र पुन्हा दारू पिण्यासाठी बसले.

त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. या वादातून संतोषच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.

घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.