-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News: माजी महापौरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास आलेल्या एकाला लोखंडी रॉडने मारहाण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – माजी महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास गेलेल्या एकाला तिघांनी मिळून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री नाणेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव येथे घडली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

गणेश सुरेश वाघेरे, राजेश सुरेश वाघेरे, सुशील श्रावण मोहन (सर्व रा. नानेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सतीश एकनाथ नाणेकर (वय 50, रा. नाणेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजता आरोपी कार मधून फिर्यादी यांच्याकडे आले. ‘तू भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास का आला होता? भिकाऱ्या तुझी लायकी आहे काय’, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून आरोपी गणेश याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. ‘तू आमच्या नादी लागू नको. तुला खाल्लास करून टाकू’, अशी आरोपींनी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.