Pune News : अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंधातून दिला बाळाला जन्म, वीस वर्षीय प्रियकर अटकेत

एमपीसी न्यूज : एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 20 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून तिने एका बाळाला जन्म दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित वीस वर्षीय प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की वडगाव बुद्रुक परिसरात राहणारे सतरा वर्षे मुलगी आणि वीस वर्षीय तरुण दोघांमध्ये मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. यावेळी संबंधित तरुणाने मुलीची इच्छा नसतानाही तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. या सर्व प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर सिंहगड पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात बलात्कारसह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.