Dehugaon : लग्नाची मागणी घालत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज –  मुलीची इच्छा नसताना तिचा पाठलाग करून तिला लग्नाची मागणी घालत तिचा विनयभंग केला. हा प्रकार दोन ते चार जून या कालावधीत देहुगाव (Dehugaon) येथे घडला.

Chinchwad : कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून एक लाखांचे साहित्य चोरीला

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहम संजय कोल्हे (रा. वाशिम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीची इच्छा नसताना तिला ‘लग्न कर’ असे म्हणून तिचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन मुलीला घराबाहेर येण्यासाठी आरोपीने खुणावले. तसेच तिचा सातत्याने पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड (Dehugaon) पोलीस तपास करीत आहेत.

Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे विभाग आणि जिल्हा सर्वोत्तम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.