Bhosari Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीच्या कंपनीतील मित्राकडून लैगिंक अत्याचार

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहिणीच्या कंपनीतील मित्राने घरात घुसून हा अत्याचार केला. शनिवारी (दि.21) रोजी भोसरी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 27 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

संतोष बाबासाहेब अंबाड (वय 27, रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने शनिवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हा फिर्यादीची बहिण यांच्या कंपनीत काम करतो. फिर्यादी घरात एकट्या असताना आरोपी घरात घुसला. फिर्यादी सोबत जबरदस्ती करून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला व कुणाला सांगितले तर सोडणार नाही अशी धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी अटकेत असून, भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.