Pune crime news: मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

A minor thief who steals a bike for fun is caught by the police

एमपीसी न्यूज- मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला चतु:शृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा अल्पवयीन मुलगा सांगवी परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतो. केवळ मौजमजा करण्यासाठी आणि हौसेपोटी त्याने अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सेनापती बापट रस्त्यावर अजून एक मोपेड दुचाकी चोरीला गेली होती. चतु:र्श्रुंगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी तेजस चोपडे यांना ही दुचाकी सांगवी येथील एका अल्पवयीन चोरट्याने चोरली असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांच्या पथकाने या अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने आतापर्यंत अशा प्रकारे तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या तीनही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. केवळ मौजमजा करण्यासाठी आणि हौसेपोटी त्याने या दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

ही कारवाई परिमंडळ पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, उपनिरीक्षक महेश भोसले, कर्मचारी तेजस चोपडे, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, मुकुंद तारू, दिनेश गंडाकुंश, आशिष निमसे, अमोल जगताप यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.