Pune News : अंधाराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला जमावाकडून मारहाण

एमपीसी न्यूज : लाईट गेल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन चोरट्याला जमावाने पकडून ठेवून बेदम मारहाण केली. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन महेश पवार (वय 19) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मुंढवा येथील केशवनगर भागात शनिवारी रात्री लाईट गेली होती. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन अल्पवयीन आरोपीने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादीच्या घराजवळील काही लोकांनी त्याला पकडून ठेवले. या परिसरात तो नेहमीच किरकोळ चोर्‍या करीत असल्याने जमलेल्या लोकांनी आणि फिर्यादीने त्याला मारहाण केली आणि लहान असल्यामुळे सोडून दिले.

त्यानंतर फिर्यादी हे घराबाहेर थांबले असताना आरोपीने त्यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. यावेळी फिर्यादीची आई त्या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असताना या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटुन खाली पडले आणि ते गहाळ झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.