BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : कौटूंबिक कारणावरून भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला

एमपीसी न्यूज – कौटूंबिक कारणावरून झालेल्या भांडणात भावाने आपल्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे गुरुवारी दुपारी घडली.

दत्ता मच्छिंद्र धावारे (वय 40, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन), असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. हरिश्‍चंद्र मच्छिंद्र धावारे (वय 35) असे आरोपी भावाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दत्ता आणि हरिश्‍चंद्र यांच्यात कौटूंबिक कारणावरून सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भांडण झाले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दत्ता हे घरात झोपले होते. त्यावेळी आलेल्या हरिश्‍चंद्र याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने खूनी हल्ला केला. या घटनेत दत्ता हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्‍टरांनी पोलिसांना सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.