Bhosari News : बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून मित्रावर खुनी हल्ला

0

एमपीसी न्यूज – बहिणीसोबत पूर्वीचे प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून एका तरुणाने मित्रावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 8) सायंकाळी लांडेवाडी भोसरी येथे घडली.

रोहन भास्कर सगट (वय 23, रा. लांडेवाडी भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत दिनेश शाहू चव्हाण (वय 20, रा. लांडेवाडी भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ गणेश शाहू चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी, त्यांचा भाऊ, मित्र अतिश हजारे व आरोपी रोहन सगट असे चौघेजण लांडेवाडी भोसरी येथे बाबर पेट्रोल पंपाच्या मागील बाजूला मोकळ्या जागेत बसले होते.

फिर्यादी यांचा भाऊ गणेश यांचे आरोपी रोहन याच्या बहिणीसोबत पूर्वीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून त्याने गणेश याला तुला सोडणार नाही, असे म्हणून चाकूने गळ्यावर, पोटावर, पाठीत आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment