Chakan News : भरदिवसा एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – भर दिवसा एकावर खुनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 28) दुपारी चार वाजताच्या सुमारास नानेकरवाडी येथे घडली.

हबीबूर रहेमान नसीम शेख असे खुनी हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शहाजात बहाब बिश्वास (वय 31, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरत यादव (पूर्ण नाव माहिती नाही. रा. नाणेकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भरत यादव हा नाणेकरवाडी मधील निको कंपनीमध्ये कामगारांच्या खोलीत राहतो. तो मूळचा बिहार येथील आहे. जखमी शेख आणि आरोपीचे बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भांडण झाले. या भांडणातून भरत यादव याने शेख यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.