Alandi Police : दरोड्याच्या तयारीत असलेल्या नेपाळी टोळीला आळंदी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – चिंबळी परिसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नेपाळी टोळीला व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना आळंदी पोलिसांनी (Alandi Police) चिंबळी येथून अटक केली आहे. हि कारवाई सोमवारी (दि.8) पहाटे पाचच्या सुमारास करण्यात आली.

नयसिंग लालसिंग ढोली (वय 48), निट बहमसिंग ढमाई (वय 32), विशाल शेटे ढोली (वय 18), दिनेश नयसिंग ढोली (वय 19) यांना अटक केली असून दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. हे सर्व मुळचे नेपाळचे असून सध्या लोणी काळभोर येथे राहण्यास आहेत.

Hadapsar Police: पोलीस तपासात सराईतांकडून घरफोडीतील 17 तोळे सोने जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात कोयता व दरोड्याचे इतर साहित्य घेऊन सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास चिंबळी परीसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीचे पत्र्याची सुरक्षा भिंत उचकटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आवाजाने आसपाच्या नागरिकांनी त्यांना हटकले व तेथून हुसकावून लावले. आरोपींनी तेथून पळ काढला व पुढे त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याच प्रयत्न सुरु केला. या दरम्यान नागरिकांनी आळंदी पोलिसांना याची खबर दिली. पोलीस परिसरात पोहचले असता त्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, 2 हेक्सा ब्लेड, मिरचीपूड, लोखंडी पान्हा, लोखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, कटर ब्लेड दोन लॅपटॉप, तांब्याचे केबल असा एकूण 4 ते 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आळंदी पोलिसांनी आज (मंगळवारी) आरोपींना (Alandi Police) न्यायालयात हजर करणार असून आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत. यावेळी टोळीचा प्रमुख अद्याप फरार असून परिसरात रेकी करून कंपनीमधील तांब्याची केबल चोरून नेणे हा त्यांचा मोडस आहे, अशी माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.