Lonavala News : वरसोली येथे बुधवारी एका नेपाळी तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – वरसोली येथे बुधवारी एका नेपाळी तरुणाचा खाणीत बुडून मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव बुध्द रामबहादुर परिहार असे आहे.त्याचे वय अंदाजे 22 वर्ष होते.

याबाबत अधिक माहिती देताना, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे म्हणाले की, “पुणे मुंबई महामार्गावरील वरसोली टोल नाक्याजवळील  डोंगराच्या जवळ दगडाची खाण आहे.त्या खाणीत एक तरुण बुडाल्याची माहिती स्थानिकांनी आमच्या संस्थेला बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास दिली होती.”

गराडे म्हणाले की, “शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळ यांच्या रेस्कयू टीम्स लगेच घटनास्थळी पोहोचली.पाण्यात गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्यात आला.”

मृत तरुण बुध्द रामबहादुर परिहार हा जवळील वेहेरगावात राहत होता.तसेच तॊ एका चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर काम करत होता.

शिवदुर्ग मित्र लोणावळाचे  रेसक्यू टीममध्ये अजय शेलार, महेश मसने, अनिल चंद्रकांत बोंबले, ओंकार कालेकर, राजेश तेले, अजिंक्य देशमुख, कपिल दळवी, अनिल सकट, सागर कुंभार व सुनील गायकवाड होते. वन्यजीव रक्षक मावळ संस्थाच्या रेसक्यू टीममध्ये अनिल आंद्रे व इतर सदस्य होते. बचाव कार्यात ग्रामस्थानी सुद्धा मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.