Corona Virus : भारतात समोर आला कोरोना व्हायरसचा नवीन AY.12 व्हेरिएंट

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसचा आता नवीन AY.12 व्हेरिएंट समोर आला आहे. इन्साकॉगच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या या नवीन AY.12 व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती नाही. या म्यूटेशनचा किती परिणाम होत आहे? हे येत्या काही दिवसांत कळेल, पण आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाल्याचे उघड झाले आहे, त्यापैकी हा एक आहे आणि भारतातही AY.12 ची प्रकरणे समोर आलेली आहेत.

याआधी शास्त्रज्ञ AY.12 ला डेल्टा व्हेरिएंटचा भाग असल्याचे मानत होते. मात्र, AY.12 च्या सक्रियतेमुळे शास्त्रज्ञांना त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करावे लागले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे.

इन्साकॉगच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, AY.12 म्यूटेशनचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्याबद्दल फारशी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध नाही. मात्र, असे आढळले आहे की जगभरातील 33 हजारहून अधिक नमुन्यांची पुष्टी झाली आहे, जी इतर डेल्टाच्या म्यूटेशनच्या तुलनेत सर्वाधिक आहे. याचबरोबर, AY.12 हा डेल्टाचा एक उप-वंश आहे, जो आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. परंतु त्याच्या संख्येची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. डेल्टा आणि AY.12 यांच्यातील परिणामांमध्ये काय फरक आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आता एवढेच म्हणता येईल की हे दोन्हीही एकसारखे दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.