BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली.
नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे जखमी प्रवाशाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / जी सी 3519 या रिक्षावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी चावरे हे आरोपीच्या रिक्षातून चालले होते. त्यावेळी आरोपीने रिक्षामध्येच थांबविली. यामुळे चावरे यांनी लवकर चला मला उशीर होत आहे, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपी रिक्षा चालकाने प्रवासी चावरे यांना शिवीगाळ करीत त्यांना शस्त्राने मारहाण केली. यामध्ये चावरे जखमी झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3