Hinjawadi : शिवनेरी बसमधून चोरट्यांनी पळविला प्रवाशाचा लॅपटॉप

एमपीसी न्यूज – मुंबई ते पुणे या मार्गावर शिवनेरी बसने प्रवास करणा-या प्रवाशाचा 40 हजारांचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तो हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

नितीन चंद्रकांत पवार (वय 36, रा. घाटकोपर, मुंबई, सध्या रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन हे 4 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वादोन ते सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान चेंबूर ते ताथवडे दरम्यान शिवनेरी बसने प्रवास करीत होेते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा 40 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याबाबत नितीन यांनी खोपोली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 22) वर्ग करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.