Moshi : मोशी येथे पादचाऱ्याला लुटले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या एका इसमास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लुटले आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) मध्यरात्री मोशी (Moshi) येथील देहू आळंदी रोडवर घडली.

अक्षय विठ्ठल सरवदे (वय 22 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

F.C. Road Crime : खाली पडलेल्या 90 रुपयांच्या आमिषापोटी 86 हजार गमावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी पायी जात असताना दुचाकीवरून (एमएच 14 डीयु 3560) आलेल्या चोरांनी फिर्यादी यांच्या जवळील मोबाईल फोन, घड्याळ, 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.