Wakad : गावठी कट्टा विक्रीप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई आज (शुक्रवारी) थेरगावमधील शनी मंदिराजवळ करण्यात आली. आरोपीकडून 15 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

रहेमत बरकतअली सिद्दीकी (वय 48, रा. थोरात यांची चाळ, रूम नंबर चार, बालाजी कॉलनी, थेरगाव. मूळ रा. गाव. महुआमाधव, ता. उतरवला, जि. बल्लामपूर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील पुणेरी स्वीट शेजारील मैदानात शनी मंदिराजवळ एक इसम गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून रहेमत याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला. कट्टा सोबत बाळगण्याच्या परवान्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा विकण्यासाठी आणला असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उप निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, अशोक दुधवणे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.